Share

परभणी जिल्हा; कोरोना सेंटरमध्ये घाणीचे साम्राज्य, पाणी ही मिळेना!

Published On: 

🕒 1 min read

परभणी: कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका पातळीवर शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयालगतच्या इमारतीत कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ७० ते ८० रूग्णांवर उपचार सुरू असताना या ठिकाणी कोणतीही सुविधा पुरवली जात नाही. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव झाला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथील उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या केअर सेंटरमध्ये ७० ते ८० रूग्ण उपचार घेत आहेत. परंतु या केंद्रात सोयी-सुविधांचा अभाव आहे. रविवार पासून अजिबात पाणी सोडण्यात आले नव्हते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात येत न आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खोलीमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना दुसरेच आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या ठिकाणी दाखल झालेल्या कोरोना रूग्णांना एक्स-रे काढण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने याठिकाणी रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. घाणीचे साम्राज्य, पाण्याची सोय नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने कोरोना रूग्णांना येथे राहणे अवघड झाले आहे. एकीकाडे कोरोना रूग्णांच्या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे कोरोना केअर सेंटरमध्ये कसलीही सुविधा नाही. कोरोना बाधित रुग्णांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे, ही गंभीर बाब आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!