नागपूर : काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली असतानाही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली अन् राजकीय वर्तुळात असंख्य चर्चाना उधाण आले. तो कार्यक्रम होता ७ जून २०१८ साली झालेल्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचा.
संघाच्या शैक्षणिक पाठ्यक्रमाच्या तृतीय वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी त्यावर्षी संघाने थेट माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निमंत्रण दिले आणि प्रणव मुखर्जी यांनी ते स्वीकारले सुद्धा. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाची स्थितीही अवघडल्यासारखी होण्यास सुरुवात झाली. अशात गुरूवारी प्रणव मुखर्जी ‘आरएसएस’ कार्यकर्त्यांपुढे नेमके काय बोलणार या एका उत्सुकतेपोटी कार्यक्रमाला तूफान गर्दी झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक मतभेद असल्याने मुखर्जींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे काँग्रेसचे म्हणणे होते. मात्र मुखर्जी यांनी ठामपणे हे आमंत्रण स्वीकारले आणि काँग्रेसच्या काही नवख्या नेत्यांनी मुखर्जींवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे प्रणवदांप्रमाणेच काँग्रेसच्या नेत्यांचे वागणे देखील प्रत्येकासाठी अनपेक्षित असेच होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला विरोध करत आलेले प्रणव मुखर्जी नेमके काय बोलणार याबाबत अनेक तर्क लढविण्यात आले. २०१७मध्ये वाढत्या हिंसेच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करताना मुखर्जी यांनी हिंसक घटनांवर टीका केली होती.
२०१२ साली शपथ ग्रहणाच्या वेळी त्यांनी विविधता आणि सहिष्णुतेबाबत विचार व्यक्त केले होते. त्यावेळी त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समतेवर आपले विचार मांडले होते. विशेष म्हणजे मुखर्जी हे हिंदुत्व आणि जातीयवादाच्या आरोपांमुळे आरएसएसचे मोठे टीकाकार मानले जात होते. पण असे असतांनाही मुखर्जी थेट सरसंघचालकांच्या उपस्थितीत त्यांचे विचार मांडण्यासाठी संघभूमी नागपुरात आले होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संघ परिवारात शोककळा पसरली आहे.
शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज खासदाराला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

