Share

परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठीच अनिल देशमुखांवर आरोप केले- नवाब मलिक

Published On: 

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचे खंडन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. अँटिलिया प्रकरणात एनआयएच्या आरोपपत्राने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. सचिन वाझेला मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरवण्यात आले. पहिल्या दिवसापासून आम्ही असे म्हणत आहोत की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर स्वतःला वाचवण्यासाठी आरोप केले. असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

तसेच परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री आणि इतरांची दिशाभूल केली आहे. तो बंद दरवाज्यामागे वाझेला भेटले. दोषारोपपत्राच्या निष्कर्षावरून स्पष्ट होते आहे की, फेरफार करण्यामागील व्यक्तीची चौकशी केली जात नाही. त्यांनी भाजपच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांना टार्गेट केले. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान एनआयएच्या दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा यामध्ये केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. तर नवाब मलिक यांनी परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठीच अनिल देशमुखांवर आरोप केले असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!