Share

Prakash Ambedkar । “…तर नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार”; प्रकाश आंबेडकरांचा टोला

Published On: 

Prakash Ambedkar । नांदेड : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांचं काय होणार? या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. अशातच शिवसेनेचे (Shiv Sena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे (congress) २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं वक्तव्य केलंय. खैरे यांच्या या वक्तव्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील हाच मुद्दा पकडत माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.

“शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत”, अशी टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीय. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात एकदा-दोनदा भेट देखील झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

“सध्या जे शिल्लक राहिलं आहे ते वाचवण्यात काँग्रेस आपलं हित पाहत आहे. काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहा पिढ्या बसून खातील एवढं त्यांच्याकडे आहे”, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावलाय. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली आहे.

ते म्हणाले, राहुल गांधी यांचा भारत जोडोचा उपक्रम चांगला आहे. परंतु, यातून फार काही हाती लागेल असं वाटत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही. सध्याचं सरकार हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. पण काँग्रेस वाले हे सर्व मांडू शकत नाहीत. कारण त्यांनी यापूर्वीही असेच केले आहे. त्यांनीच देशातील सार्वजनिक मालमत्ता महागड्या उद्योगपतींना विकायला सुरुवात केली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीय. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून काय उत्तर येणार हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!