Share

पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे

Published On: 

औरंगाबाद :  देशात जातीयवादी सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, ओबीसी आणि आदिवासी त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार खुप वाढले आहेत. १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी पँथरची पुर्वीपेक्षाही आज खुप आवश्यकता आहे. यासाठी पँथरचे सर्व छोटे मोठे ग्रूप एकत्र करुन पँथरची एकच आणि शक्तिशाली संघटन बनविण्यासाठीआंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या औरंगाबाद शहरात अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अॅड. रमेश खंडागळे यांनी दिलीय.

भारतीय दलित पँथरच्या पुनर्गठणाची चौथी बैठक ५ जानेवारी २०१५ रोजी नांदेड येथे झाली होती. या बैठकीत पँथरचे अधिवेशन औरंगाबाद येथे घेण्यात यावे असे ठरले. हे अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारी २०२१ ला संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथे घेण्यात येणार असल्याचे पँथरचे प्रमुख संयोजक अॅड. रमेश खंडागळे यांनी सांगितले.

विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयात अनेक कार्यकर्त्यांशी तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब येथील पँथरमध्ये सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क व संवाद करुन हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. गुजरातचे राहुलभाई परमार, दिल्लीचे अँड. विकास फकिडे, उत्तरप्रदेशचे साथी धनीराम सिंह यांना अधिवेशनास आमंत्रित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनास कार्यकर्त्यांनी व जनतेनी मोठया संख्येने सामील होऊन हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन  करण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!