चेन्नई : चेन्नईच्या एम. ए.स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा हिला 578 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर पाहुण्या संघासाठी कर्णधार जो रूटने द्विशतकी खेळी केली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डोम सिब्ली आणि बेन स्टोक्सने त्याला चांगली साथ दिली ज्यामुळे संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला.
एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (७ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते.
मात्र, त्यांनी सावध सुरुवात केल्यानंतर लगेलचच चौथ्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला झेलबाद केले. रोहितचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला. त्यामुळे रोहितला ९ चेंडूत ६ धावा करुन माघारी परतावे लागले.
चौथ्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर पुजारा आणि गिल चांगला खेळ करत होते. गिलने यावेळी काही शानदार फटकेही खेळले. मात्र, जोफ्रा आर्चरने चांगल्या लयीत असलेल्या गिलला झेलबाद केले. गिलचा झेल मिड-ऑनला जेम्स अँडरसनने उत्तमप्रकारे झेलला. त्यामुळे गिलला २८ चेंडूत २९ धावा केल्यानंतर विकेट गमवावी लागली. गिल बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
- ‘आंदोलकांना अडवायला खिळे ठोकणे हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं’
- जो रूटची द्विशतकी खेळी ; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात
- ‘पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल बोलणार, किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’?
- Rose Day Special : मैत्रिणीला गुलाब द्यायचा आहे तर मग जाणून घ्या प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे महत्त्व


