🕒 1 min read
बीड: जिल्ह्यातील बीड पोलीस दलाचे वैशिष्ट असलेला श्वान ‘डॉन’ चे शनिवारी वृध्दपकाळाने निधन झाले. आपल्या गुणवत्तेवर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवून देत बीड पोलिस दलाची मान उंचावली होती. ‘डॉन’ हा श्वान पथकातील पहिला गुन्हे शोधक श्वान होता. मागील काही महिन्यांपासून तो वयोमानाप्रमाणे आजारी पडत असल्याने नोव्हेंबर २०२० मध्ये त्याला निवृत्ती दिली गेली होती. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता त्याचे निधन झाले. भावपूर्ण वातावरणात त्याला अंतिम निरोप दिला गेला.
जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकाची स्थापना सन २०१० मध्ये झाली. अडीच महिन्यांचा डॉन हा श्वान पथकातील पहिला गुन्हे शोधक श्वान होता. जर्मन शेफर्ड जातीचा डॉन हट्टी स्वभावाचा मात्र, आपल्या कामात निष्णात होता. जमिनीवरून वास घेत तो अचूकतेने चोरट्यांचा माग काढत असे. जिल्हा पोलिस दलात १० वर्षे सेवा करताना डॉनने ४३६ गुन्ह्यांत पोलिसांना चोरट्यांचा माग दाखवण्याचे काम केले. अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देश स्तरावर डॉनची डॉनगिरी त्याच्या काळात कायम होती.
भोपाळ येथे झालेल्या मेळाव्यात डॉनने कांस्यपदक पटकावत राज्याचे नाव उंचावले होते. तर, हरियाणा, चेन्नईच्या मेळाव्यांमध्येही टॉप फाइव्हमध्ये स्थान पटकावले होते. राज्यस्तरावर झालेल्या मेळाव्यात ३ सुवर्णपदके तर परिक्षेत्रीय मेळाव्यातही ३ सुवर्णपदके त्याने पटकावली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते ‘डॉन’ या श्वानाचा गौरव झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
- ‘आंदोलकांना अडवायला खिळे ठोकणे हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं’
- जो रूटची द्विशतकी खेळी ; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात
- ‘पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल बोलणार, किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी’?
- Rose Day Special : मैत्रिणीला गुलाब द्यायचा आहे तर मग जाणून घ्या प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे महत्त्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
