Share

माझ्याविरुद्ध घाण ओकणाऱ्या नेत्यांच्या तोंडाला ‘जामर’ बसवा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वच नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. परळीच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी एका सभेदरम्यान धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या जीवनातील ते क्षण जे माझ्या लेकराचे होते, माझ्या कुटुंबाचे होते. तेवढे क्षण मी तुम्हाला दिले कारण तेवढे क्षण माझे बाबा कमी जगले. अर्ध्या ताटावरून माझे वडील गेले. त्यामुळे तुमची सेवा मी केली अशी भावनिक साद मतदारांना घातली.

पुढे बोलताना राष्ट्रवादीचे नेते माझ्यावर आरोप करतात. किती वाईट बोलतात किती घाण ओकतात. मोबाइल टॉवरला जामर लावा म्हणणाऱ्या नेत्याच्या तोंडाला ‘जामर’ बसवा अशा शब्दात पंकजा यांनी धनंजय यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचा नायनाट हा माझ्या हातूनच होणार आहे. काल माझ्या भावाने माझ्याविरुद्ध खूप घाणेरडे भाषण केले? आणि मी कितीही नाही बोलायचे म्हणले तरी मला बोलण्यास मजबूर करत आहेत. राष्ट्रवादीवाले इतके वाईट बोलतात की, माणसाने कानात गंगाजल टाकावे इतके यांचे विचार घाणेरडे बोलतात असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान राज्याची हाय व्होल्टेज लढत म्हणून परळी मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. यावेळीही भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघातून पंकजा यांनी २००९ आणि २०१४ ला धनंजय मुंडेंना पराभूत केले होते. त्यामुळे आता बहिण – भावात कोण विजयी होणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1185218916823388161?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185214291856674816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185214134779932672?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!