टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा परळी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्यासह पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘माझी लढाई कोण्या एका व्यक्तीशी नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे, माझे विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, पण मी मात्र तुमच्या सेवेसाठी लढत आहे. तुम्ही मला मतदारसंघाची पहिली आमदार केले आता नामदार करण्यासाठी आयुष्यातला एक महिना माझ्यासाठी द्या असं विधान केले आहे.
पुढे बोलताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी मला राज्यभर फिरायचे असून माझ्या विजयाची लढाई लढण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. तुम्ही माझे सैनिक आहात, त्यामुळे ही लढाई तुमच्या स्वाधीन करत आहे, बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नांव पुसायला निघाली आहेत, परंतु कितीही प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही, कारण या भागातील जनतेने त्यांच्यावर पोटच्या लेकरासारखे प्रेम केले आहे असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आता संपली असून बुडत्या पक्षाला आधार देण्याचे काम सुज्ञ जनता करणार नाही, अशा बुडत्या पक्षाचे नेते केवळ निवडणुक डोळ्यासमोर ठेवून बीड जिल्ह्यात येतात आणि फोडाफोडीचे व जाती पातीचे राजकारण करतात. सत्ता असताना जिल्ह्याला डझनभर आमदार देणाऱ्या राष्ट्रवादीने परळी व बीडसाठी एक तरी उद्योग आणला का? राष्ट्रवादीचे नेते नाटकं चांगली करतात, सरकारमध्ये टाचणी पडली तरी आम्हाला कळते असे म्हणणा-यांना स्वतःच्या उमेदवाराने निवडणूकीत माघार घेतल्याचेही कळाले नाही त्यामुळे जे लोक स्वतःचे कधी झाले नाहीत, ते दुस-यांचे कधी होणार? असं विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176720895957585920?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176720677815980032?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176721175767945217?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

