Share

भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडे केंद्रात तर प्रीतम मुंडेंवर राज्यात मोठी जबादारी

Published On: 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यात प्रदेश उपाध्यक्षा करण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे केंद्रात आणि प्रीतम मुंडे राज्यात अस चित्र पक्ष स्तरावर तरी पाहायला मिळणार आहे. यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार का ? यावर निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘या’ बाबतीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचा जयंत पाटलांचा दावा

गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी कार्यकारिणीच्या प्रमुख पदांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे.

भाजपच्या महामंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, तर एकूण 12 जण पक्षाच्या उपाध्यक्षपदी असतील. यामध्ये राम शिंदे, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आदींचा समावेश आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये असतील, आयटी विभागाचे प्रमुख आशिष कुलकर्णी असतील.

भाजपने घोषित केलेल्या या जम्बो कार्यकारणीत कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.

नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत. नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपची कार्यकारिणी महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

‘पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा’

उपाध्यक्ष -माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!