Share

प्रदेशाध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या असल्या तरी पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत – मेटे

Published On: 

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कमळाची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या मास लीडर पंकजा मुंडे या देखील पक्षावर नाराज असल्याचे वेळोवेळी बोलण्यात येतं. त्यामुळे एकनाथ खडसे नंतर पंकजा मुंडे देखील भाजप सोडतील असे कयास बांधले जात आहेत. तर शिवसेनेने पंकजा मुंडेंना ऑफर देखील आहे.

अशात पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायम मेटे यांनी व्यक्त केला आहे. खरंतर खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

पण यावर पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही.’ असं विधान करत विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!