Share

‘ठाकरे कुटुंबियांशी जवळीक असली तरी पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मात्र हे वृत्त केवळ एक अफवा आहे. यावर कार्यकर्त्यांनी आणि जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन केले आहे.

तर भाजप नेते विनोद तावडे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबियांशी जवळीक असली तरी त्या शिवसेनेत वगैरे प्रवेश करणार नाहीत. भाजप पक्षाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी स्वतः पंकजा मुंडेंशी बोललो आहे. त्या पक्षांतराचा किंवा भाजप सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत, असे विनोद तावाडे म्हणाले.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणले की, गेले २ दिवस पंकजा मुंडे ह्या पक्ष बदलणार आहेत, आशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र आम्ही सर्व भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या संपर्कात आहे. त्या असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत. १२ डिसेंबर हा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जयंतीचा दिवस आहे. या जयंतीला आम्ही सर्व भाजप नेते गोपीनाथ गडावर जात असतो. आयोजित कार्यक्रमात सहभागी होत असतो. त्यामुळे याही वर्षी आम्ही सार्वजण गोपीनाथ गडावर जाणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष बदलणार आहेत, हे वृत्त केवळ अफवा आहे, असे पाटील म्हणाले.

तर राज्यात आलेले अपघाती सरकार पंकजा मुंडेंच्या पोस्टचा गैरअर्थ लावत मनात मांडे खात आहेत. पंकजा मुंडे ह्या पराभवाच्या आत्मपरीक्षणाच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे त्या भाजप सोडून जाणार आहेत, असा अर्थ लावणे चुकीचे आहे. पंकजा मुंडे ह्या पहिल्यापासून भाजपच्या होत्या, आहेत आणि पुढेही राहणार आहेत, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पंकजा मुंडे या लवकरच राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. याचा संकेत त्यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करत दिला होता. मात्र त्यांनी अजून एक संकेत दिला आहे. यावरुन त्या लवकरच भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चांणा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील भाजपचा उल्लेख हटवला आहे.

‘आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. पुढील मार्ग व दिशा ठरवण्यासाठी, आपली शक्ती काय व लोकांची अपेक्षा काय हे पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वजण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर या’, या आशयाची भावनिक पोस्ट शेअर करत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1201429153406259200?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201417564129095680?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201411037360033792?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!