Share

पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांना यश, बीडमधील वंचित शेतक-यांना मिळाला पीक विमा

Published On: 

🕒 1 min read

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे खरीप पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्हयातील साडे नऊ हजार शेतक-यांना विमा कंपनीने ६ कोटी ८९ लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला वर्ग केले आहेत.

पंकजा मुंडे यांनी आठ दिवसांपूर्वी दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला लेखी पत्र पाठवून त्यांची चुक त्यांच्या निदर्शनास आणून दिली व शेतक-यांना सदर रक्कम तातडीने देण्याची सूचना केली. विमा कंपनीने काल या सर्व ९५०९ शेतक-यांची ६ कोटी ८९ लाख ५८ हजार २६१ इतकी विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेला वर्ग केली. शाखानिहाय मिळालेली विम्याची रक्कम पुढीलप्रमाणे- (कंसात लाभार्थी) परळी – ४ कोटी २५ लाख ८ हजार ८२ (३४५५), तलवाडा- १ कोटी २८ लाख ८७ हजार १२९ (२१३२), गढी- ६३ लाख १९ हजार ६७४ (२१११), गेवराई- ७२ लाख ४१ हजार ४२४ (१७९६), रूई नालकोल- १ हजार ९५२ (१५)

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा मिळाल्याने शेतकरी व त्यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला असून शेतक-यांनी याबद्दल पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीवर ‘साडेसाती’ ? पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर एकत्र शनी दरबारात

भावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे

आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला

महाराष्ट्राची राज्य भाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानी करून टाका : धनंजय मुंडे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!