Share

भावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच तीव्र होताना दिसत आहे, दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने जलसमाधी घेतली होती, यानंतर संपूर्ण राज्यात आक्रोश उफाळून आला आहे. काल महाराष्ट्र बंद ठेवल्यानंतर आज मुंबईमध्ये बंद पाळला जात आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक आवाहन करत युवकांनी जीव देऊ नका, असे आवाहन केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

माझा वाढदिवस दरवर्षी मी अत्यंत साधेपणाने, माझ्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा करते

यावर्षीही तसाच नियोजन होतं पण गेल्या काही दिवसातील घटनांनी मन विषष्ण झालं आहे ..माझ्या महाराष्ट्रातील माझा एक भाऊ ‘काकासाहेब शिंदे’ याने स्वतःचा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं, तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दुःखाची कल्पना ही कोणी करू शकत नाही. मी सर्व सुन्न होऊन बघत आहे आणि अगदी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्याची घाई ही केली नाही. कारण भावना, पीडा बाजूला ठेवून केवळ राजकीय भांडवल करणं मला कधी जमतच नाही.

एका उमेदीने, जग बदलण्याचा जिद्दीने आम्ही तरुण राजकारणात आलो आहोत, वंचित, पीडित यांचं जीवन बदलण्यास काही करण्यासाठी आम्ही राजकारण करत आहोत..त्यात यशस्वी होण्यासाठी तशी शिवरायांच्या विचारातील पोषक समाज व्यवस्था हवी . या विषयी आजकाल चिंता वाटते पण सर्व पार पडेल कारण हा छत्रपतींचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. माझी ‘काकासाहेब शिंदे ‘या माझ्या भावाला मनापासून श्रद्धांजली .. या परिवाराच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे.

सतत लोक शुभेच्छा देण्यासाठी येण्याची विचारणा करत आहे, त्यामुळे कृपया नोंद घ्यावी मी वाढदिवस साजरा करणार नाही, पुष्पगुच्छ ,सत्कार स्वीकारणार नाही ..

मी 26 जुलै ला परळीत जाईन माझ्या वैद्यनाथाच दर्शन घेईन, समाजात प्रेम, सुख ,शांती,विकास नांदो ही माझी जवाबदारी यशस्वी करण्याची माझ्या प्रतिज्ञा पुर्तीसाठी मी जाईन!! मी लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी कटीबद्ध आहे..परत कोणत्या घरचा दिवा विझू नये हीच अपेक्षा आहे. भावानो स्वतःचा जीव नका रे देऊ आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो..

माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याचं समर्थन मुंडे साहेबांनी ही केलं होतं व आम्ही ही करतो ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व ओ बी सी वर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची देखील आहेच व माझी ही आहे. हे एकत्र शक्य होऊ शकेल असा मला पुर्ण विश्वास आहे. या साठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही ,मुख्यमंत्री व शासन कटिबद्ध आहोत.आवश्यकता आहे ती धैर्याची !!

माझ्या भेटींसाठी परळीत येणाऱ्याना नम्र विनंती

कृपया कोणीही भेटी, पुष्पहार, गुच्छ,केक, सत्कार साहित्य आणू नये .कर्तव्य प्रथम हेच मी शिकले आहे मला सहकार्य करावे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!