Share

‘त्या’ सहा जिल्हा परिषद सदस्यांना पंकजा मुंडेंकडून दिलासा

Published On: 

🕒 1 min read

बीड: पक्षादेश धुडकावत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाच तर आ. क्षीरसागर समर्थक एका जिल्हापरिषद सदस्याचे पद रद्द करण्याच्या बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर पंकजा मुंडे यांची सत्ता कायम राहणार आहे.

बीड जिल्हापरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस समर्थक असणाऱ्या पाच सदस्यांनी पक्ष आदेश धुडकावत भाजपला मतदान केले होते. तर आ क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे मतदानावेळी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला होता. या सर्व प्रकरणावर बीड जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे सुनावणी झाली. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सिंह यांनी पक्षादेश डावलल्याप्रकरणी सहाही सदस्यांना अपात्र ठरवलं होतं.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!