Share

‘पालखी मार्गामुळे विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासालाही चालना मिळणार’, पंतप्रधान मोदींचा विश्वास

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे २२५ किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीवरून संवाद साधला. तर पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात दाखल झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरूवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. ‘मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो,’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांचं अभिनंदन केलं.

मोदींनी राम कृष्णहरी… राम कृष्णहरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली. शंकराचार्याने सांगितलं आहे पंढरपूरला आनंदाचंही प्रत्यक्ष स्वरुप आहे. आज त्यात सेवेचा आनंदही मिसळला आहे. मला आनंद होत आहे संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचा शुभारंभ होत आहे. वारकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. पंढरपुराकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आणखी उंचावेल, असं मोदी म्हणाले.

पंढरपूरशी आपलं वेगळं नातं आहे म्हणत त्यांनी, भगवान द्वारकाधीश पंढरीत येऊन विठ्ठल झाले, तसंच पंढरपूर माझ्यासाठी दक्षिण असल्याने देखील माझं नातं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ही भूमी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम हे संत दिले असल्याचं म्हणत, त्यांनी पंढपूरची वैशिष्ट्य सांगितली. एकुणच या महामार्गातून सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!