Share

सुशांतसिंग प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही, धर्मा पाटलांच्या वेळेस पाझर का फुटला नाही ?

Published On: 

धुळे : सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी घणाघाती टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.

मी आपला साधा भोळा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे तेवढ्याच जगाच्या मर्यादित प्रश्न उभे राहतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना आमच्या जिल्ह्यातील धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी भाजप नेत्यांना पाझर फुटला नाही. धर्मा पाटिल यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी सुशांत सिंहच्या प्रकरणी आकाश पाताळ एकत्र करणाऱ्यांनी नेमके काय प्रयत्न केले होते? असा अत्यंत बाळबोध प्रश्न मला पडला आहे.

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचा रिमोट बारामतीत, भाजपचा जोरदार प्रहार

शेतकऱ्याने आपल्या कार्यालयात आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना आपण शोधून काढले का? की बिचाऱ्या शेतकर्‍यांच्या प्राणास काहीच किंमत नाही. कारण त्यांना आत्महत्या करण्याची पाळी आणायला भाग पाडणारे आपल्या मंत्री मंडळातील सहकारी होते म्हणून आपण डोळ्यावर भाजपने सोडलेल्या सांडाचे कातडे पांघरून घेतले होते का? आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यचे भांडवल करणे यालाच तर म्हणतात ना प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा?, असा प्रश्नही अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

मोठी बातमी : जेडीयूच्या तिकिटावर ऐश्वर्या राय उतरणार बिहारच्या रणसंग्रामात ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!