Share

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचा रिमोट बारामतीत, भाजपचा जोरदार प्रहार

Published On: 

सोलापूर : आमदारकी पदरात पाडण्यासाठी राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा घाट घातला आहे. मुंबईकडे जाणारे दूध रोखून धरण्यापेक्षा मातोश्रीवर जाणारे दूध बंद करा. मुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री हेच शेट्टी यांचे बोलवते धनी असून राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचं कनेक्शन मातोश्रीवर तर रिमोट बारामतीत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली.

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकताच सोलापुरात मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर देशमुख म्हणाले, सोलापूर येथे आंदोलनाला परवानगी नसताना सरकारच्या आशीर्वादाने सुपारी घेऊन आंदोलनाचे निमित्त करून शेतकऱ्यांना गंडवण्याचे दुकान राजू शेट्टी यांनी उघडले आहे.

मोठी बातमी : जेडीयूच्या तिकिटावर ऐश्वर्या राय उतरणार बिहारच्या रणसंग्रामात ?

राज्यात भाजप प्रबळ विरोधक झाला असून भाजपला राज्यातील शेतकऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत आणि सर्वाधिक जागा देखील निवडून दिल्या आहेत. याचा रोष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मनात खदखदत आहे. सत्तेत येताच तोच रोष आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर काढला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.

जालना शहरातील 107 वर्षीय वृध्द महिलेने केली कोरोनावर मात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!