नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाकिस्ताननं दिल्ली ते लाहोर बससेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दिल्ली वाहतूक महामंडळानंही ही बस काल रद्द केली; त्यामुळे दिल्लीहून लाहोरला ही बस रवाना झाली नाही. डीटीसीनं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून दिलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द केले आहे. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. तर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडले आहेत. तसेच भारताशी कोणत्याही पद्धतीशी चर्चा आणि जवळीकता साधण्याचा इथून पुढे प्रयत्न केला जाणार नाही, असा आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काढला आहे.
पाकिस्तान एवढ्यावर थांबला नसून आता भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जाणार असल्याचं पत्रक पाकिस्तानने प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध केले आहे.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ विश्वासू सहकाऱ्याने घेतली राज ठाकरेंची भेट ; वेगवेगळ्या चर्चांना उधान
पूरपरिस्थितीवर बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर
‘कलम 370मुळे जम्मू काश्मीर भारताशी मनाने जोडला होता, आता तो बंध देखील तुटला’
काश्मीरमध्ये जमिन घेण्याची घाई का? शरद पवारांचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

