नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारावरून सुरू असलेला सस्पेंस आता संपला आहे. भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची (KL Rahul) निवड करण्यात आली आहे. केएल राहुलची उपकर्णधारपदी निवड झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
केएल राहुलवर भाष्य करताना सलमान बट म्हणाला, “एखाद्या खेळाडूला तेव्हाच उपकर्णधार बनवले जाते, जेव्हा त्याच्यामध्ये भावी लीडरची झलक दिसते. त्याच्या मते, भारतीय ‘थिंक टँक’ केएल राहुलकडे भविष्याचा कर्णधार म्हणून पाहत आहे आणि म्हणूनच त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या अजिंक्य राहणेच्या जागी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यापुर्वी सराव करत असताना त्याला दुखापत झाली. यामुळे रोहितला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. यानंतर केएल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
केएल राहुल एक उत्तम कर्णधार आहे : सलमान बट
त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान, सलमान बटने केएल राहुलच्या उपकर्णधारपदी नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी तो म्हणाला, केएल राहुलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. तो खूप चांगला कर्णधार आहे. तो खेळाचा चांगला विचार करतो. आयपीएलमध्ये त्याच्याकडे चांगली टीम नव्हती पण तो स्वत:च्या बळावर संघाला पुढे घेवून जाताना दिसला. यावरून तो जबाबदारी घेऊ शकतात हे दिसून आले. तुम्ही एखाद्या खेळाडूला तेव्हाच कर्णधार बनवता जेव्हा तुम्हला त्याच्यात भावी लीडरची झलक दिसते.
महत्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- ‘महाराजांचा अवमान तर सोडाच, अनादरही खपवून घेतला जाणार नाही’
- कदम कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांची किंमत शून्यच; निलेश राणेंची जहरी टीका
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

