Share

Pak vs Aus: बाबर आझमने ODI मध्ये रचला नवीन रेकॉर्ड ; विव रिचर्ड्स आणि विराट कोहलीला सोडले मागे!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तानची ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु आहे. ज्यात पाक कर्णधार बाबर आझमने मंगळवारी आपल्या अप्रतिम फलंदाजीची पुन्हा झलक दाखवली . त्याने लाहोर येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५७ धावा केल्या. पण त्याचे आणि शतकवीर इमाम-उल-हकचे प्रयत्न व्यर्थ गेले कारण पाकिस्तानला सामना गमवावा लागला. मात्र त्याने या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड रचला आहे.

झालेल्या सामन्यात बाबर आझम (babar azam) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पार करणारा १५ वा पाकिस्तानी फलंदाज ठरला. बाबरने त्याच्या ८२ व्या डावात ४००० धावा पूर्ण केल्या, ज्यामुळे तो सर्वात वेगवान पाकिस्तानी फलंदाज बनला आहे. इतकेच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करणारा बाबर हा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज आहे, ज्याने अव्व्ल येण्याचा गुण केवळ एका डावाने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला (hashim amla)पुढे गमावला. कारण अमलाने ८१ डावांमध्ये हा पराक्रम केला होता.

आता बाबरला एकदिवसीय क्रिकेट खेळलेल्या दिग्गज क्रिकेटर्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. ज्यात बाबरने वेस्ट इंडिजचा दिग्गज व्हिव्ह रिचर्ड्सला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे, ज्याने ४००० वनडे धावा पूर्ण करण्यासाठी ८८ डाव घेतले. इंग्लंडचा जो रूट ९१ डावांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे तर भारतीय रन मशीन आणि माजी कर्णधार विराट कोहलीने ९३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. कोहली सोबत बाबीरची तुलना नेहमी होते. ज्यामुळे आता बाबरला या कामगिरी मुळे एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!