Share

IPL 2022 : शेन वॉटसनला मागे सोडत संजू सॅमसनने रचला ‘हा’ रेकॉर्ड!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात संजू सॅमसनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना वेड लावले आहे. या सामन्यात तो अनेक षटकार आणि चौकार मारताना दिसला . राजस्थान संघाने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. दरम्यान कर्णधार संजूने दमदार फलंदाजीनंतर शेन वॉटसनला मागे सोडत एक नवीन रेकॉर्ड रचला आहे.

आयपीएलच्या पाचव्या सामन्यात संजू सॅमसनने (sanju samson) राजस्थान रॉयल्सकडून (RR) अर्धशतक झळकावून नवा विक्रम केला. या सामन्यात त्याने पाच षटकार मारले असून त्यासोबतच त्याने शेन वॉटसनचा (Shane watson) षटकारांचा एक वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला आहे. राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता सॅमसनच्या नावावर झाला आहे, याआधी हा विक्रम वॉटसनच्या नावावर होता.

शेन वॉटसनने २००८ ते २०१५ दरम्यान राजस्थान रॉयल्ससाठी एकूण ११४ षटकार ठोकले आहेत, तर सॅमसनने झालेल्या सामन्यात पाच षटकार मारल्यानंतर आता एकूण ११५ षटकार मारले आहेत.२०१३ ते २०२२ दरम्यान त्याने हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर या यादीत त्याच्या संघाचा जॉस बटलर तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत एकूण ६७ षटकार ठोकले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!