🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील लातूरात शिवाजी जयंतीचे औचित्य साधून, मंगळवारी देशातील पहिले ग्रास पेंटिंग (Grass Painting) तयार करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शेतामध्ये हे पेंटिंग बनवण्यात आले . अक्का फाऊंडेशनच्या २.५ लाख स्क्वेअर फीट शेतात शिवाजी महाराजांची ही भव्य पेंटिंग साकारली गेली आहे.
मंगेश निपाणीकर ह्यांनी ही रचना साकारली आहे. गेल्या वर्षी अरविंद पाटील निलंगेकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती. हे पाहून मंगेशने यावर्षी काही वेगळे करण्याचा निश्चय केला होता. यातून ही कलाकृती निर्माण झाल्याचं ते म्हणाले.
गवतातील पेंटिंग साकारण्यासाठी, मंगेशने निलंगा गा शहरातील दाबका रोड यथे ६ एकर परिसरात गवत उगवण्यास सुरुवात केली. मंगळवारी जेव्हा हे गावात हिरवे झाले तेव्हा ही पेंटिंग साकारली गेली. कलाकार मंगेश निपाणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेंटिंगकरीता गवत उगवण्यासाठी जवळजवळ दीड हजार किलो बियाणे वापरला गेले. आकृतिचा आकार निश्चित करण्यासाठी एक आठवडाभर आधी बियाणांचे रोपण केले गेले होते. या पेंटिंगमध्ये थ्री डी इफेक्ट आणण्यासाठी त्यात ग्राफिंगही केले गेले. लोकांना हे पेंटिंग पाहण्यासाठी शेताच्या चारही बाजूंना मोठ्या स्क्रीन लावले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

