Share

५० हजार रुपयांना हातही लावला नाही,चोरांनी पळवली फक्त कोरोनाची लस

Published On: 

जिंद – कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र विरुद्ध राज्य असा देखील काही ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत असताना आता चक्क कोरोना लस चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरियाणामधील जींद येथील सिव्हिल रुग्णालयात ही घटना घडली असून, गुरुवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली. कोरोना लसींचे एकूण १७१० डोस चोरीला गेले आहेत. यापैकी १२७० कोव्हिशिल्ड आणि ४४० कोव्हॅक्सिनच्या डोसचा समावेश आहे.चोरांनी लस पळवली असली तरीही सेंटरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये सुरक्षित असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेनंतर आता पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून, पुढील तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या लस चोरांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी जोर धरत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी होताना दिसत आहे.

चोरीच्या या घटनेमुळे या सिव्हिल रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रुग्णालयात कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आला असून, दिवस-रात्र कर्मचारी ड्युटीवर असतात. याशिवाय सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले आहेत. तरीही अशा प्रकारे कोरोना लसींची चोरी कशी झाली, असा सवाल विचारण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!