चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या संघाने निर्धारित २० षटकात १४९ धावा केल्या. आरसीबीकडुन मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४१ चेंडुत ५९ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने पाच चौकार आणि ३ षटकार लगावले. कर्णधार कोहली (३३) वगळता इतर फलंदाजांची पुरशी साथ न मिळाल्याने आरसीबीचा संघ १५० धावांचा टप्पाही ओलांडु शकला नाही.
दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर वृद्धीमान साहा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मनिष पांडे आणि कर्णधार वॉर्नर यांनी ८३ धावांची भागीदारी करत विजय आवाक्यात आला. मात्र कर्णधार वॉर्नर बाद होताच सामन्याचे चित्रच पालटले. हैदराबादचे एकामागोमाग सर्व फलंदाज तंबुत माघारी परतले. तळाच्या फलंदाजापैकी राशिद खानने छोटेखानी खेळी करत विजयाच्या आशा पल्लवीत केल्या मात्र तो बाद होताच सामना हैदराबादच्या हातातुन निसटला.
महत्वाच्या बातम्या
- कोराेना रुग्णांचा विक्रम , परभणीत १ हजार १७२ व्यक्ती कोरोनाबाधित, २० बाधितांचा मृत्यू
- खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन ; गुलाबराव पाटलांची खास शैलीत फटकेबाजी
- शिवसेनेच्या ढाण्या वाघाची कानडी भूमीत डरकाळी; संजय राऊतांचा भव्य ‘रोड शो’
- परभणी पोलिस दलातील ११२ अधिकारी – कर्मचारी कोरोना बाधीत
- नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्र्यांनी दिले सक्त आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

