मुंबई: राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केलं जाणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी यूजीसीनं अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याचा सूचना सर्व राज्यांना केल्या. परंतु परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम होतं. दरम्यान, यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्याविरोधात रिट याचिका दाखल केली होती.
राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा काहीसा पेच परिक्षांसंदर्भात निर्माण झाला आहे. आता युवासेना अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्यांनातर युजीसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. ज्यात युजीसीतर्फे, देशातील ७५५ पैकी ५६० विद्यापीठं हे परीक्षा घेण्यास तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक;बळीराजाला मायबाप सरकारकडून मोठी आशा
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जगातील इतर काही देशांमध्ये परीक्षा घेतल्याचं किंवा घेण्याबाबत नियोजन सुरु असल्याचाही दाखला देण्यात आला आहे. तसेच परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असल्यावर भर दिला आहे. तसेच गृहमंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशांचाही आधार घेत परीक्षेच्या निर्णयावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. परीक्षा घेताना कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी सर्व खबरदारी घेतली जाईल, असंही नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात टीव्ही ९ मराठी ने वृत्त दिले होते.
आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? सदाभाऊ खोत यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल
तसेच, यूजीसीने या पत्रकात म्हटलं आहे, “नुकतेच विद्यापीठांना परीक्षा घेणं शक्य आहे की नाही याची माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं. ९४५ विद्यापीठांपैकी ७५५ विद्यापीठांनी यावर प्रतिसाद दिला आहे. यापैकी ५६० विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत किंवा परीक्षा घेण्याचं नियोजन केलं आहे. यातील १९४ विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. तर ३६६ विद्यापीठांनी ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली आहे.”
आजपासून ग्राहकांना मिळणार ‘हे’ नवीन अधिकार; ग्राहकांना होणार थेट फायदा
दरम्यान, युवासेनेने केलेल्या या याचिकेला महाराष्ट्र युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील समर्थन दिले आहे. मंत्री व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी हि माहिती ट्विटर द्वारे दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी, ‘ युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला महाराष्ट्र युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका,’ अशा शब्दांत हे जाहीर केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
