Share

आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? सदाभाऊ खोत यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल

Published On: 

सांगली- राज्यात दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यातच आता दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्याकरिता माजी खासदार राजू शेट्टी हे देखील मैदानात उतरणार आहेत.

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? असा सवाल करत, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही परदेशी वाटलो असल्यानेच त्यांनी बैठकीला बोलावलं नाही, आम्ही आमदार आहोत, आम्हालाही बैठकीला बोलावलं पाहिजे होतं, असं म्हणत आ. सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे.झी २४ तासने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी ज्या दिवशी बोलावलं त्याच दिवशी ते आंदोलन करत आहेत, त्यांची ही भूमिका दुटप्पी आहे. तसंच आमदारकी मागायला तुम्ही बारामतीला गेलेत मात्र बैठकीसाठी न जाता आंदोलन करतात, ही भूमिका शंकास्पद असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.

दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘भिक नको घामाचे दाम द्या’ अस म्हणत शेतकरी आंदोलन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सोमवारपासून लागू होणार ‘हा’ नवा कायदा,ग्राहकांना होणार थेट फायदा

‘राममंदिराच्या भूमी पूजनामुळे पवारांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे’

सोलापूरकर कोरोनावर निश्चित मात करतील;खासदार शरद पवार यांना विश्वास

खा.पवारांच्या सोलापूर दौऱ्यावरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य,जेष्ठ नेत्याने केली खंत व्यक्त

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!