🕒 1 min read
मुंबई : आज(२७ सप्टें.)जागतिक पर्यटन दिन यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लेण्यांविषयी वक्तव्य केले. ‘देशातल्या १२०० पैकी ८०० लेण्या महाराष्ट्रात आहेत. तसेच आता आजच्या युगातील लेणी तयार करायला हवी’ असे ते म्हणाले.
World Tourism Day – LIVE https://t.co/WyztgblVC0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 27, 2021
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की,’देशभरात जेवढ्या लेण्या आहेत त्यातील सर्वाधिक म्हणजे १२०० पैकी ८०० लेणी महाराष्ट्रात आहेत. यातील ९० टक्के लेण्या अजूनही आपल्याला माहिती नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने लेणी कोरल्या तशा आज निर्माण करता येतील का? आपणही एक आजच्या युगातील लेणी तयार केली पाहिजे. केवळ जुने जतन करणं नाही तर नवंही तयार केलं पाहिजे. बार्सिलोनामध्ये पुरातन काळापासून निर्माण केलं जाणारं चर्च आहे. त्यात सुरुवातीपासून आजपर्यंतच्या शैलीचे काम पाहायला मिळतं’ असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान,’महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पर्यटन विभागाने प्रयत्न करावेत. पर्यटकच आपले ब्रँड अम्बॅसिडर झाले पाहिजेत, दुसऱ्याची गरज पडायला नको’ अशी सूचना ही यावेळी ठाकरेंनी पर्यटन विभागाला दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- १ ऑक्टोबरपासून बँकेतील नियमासह ‘या’ पद्धतीत होणार बदल
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- ‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
