मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या जाव्यात ही आमची भुमिका आहे. भाजपची जशी लाटेवर सत्ता आली यावेळी आमची लाट आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुण्यात आघाडी अथवा युती झाली तरी शिवसेना 80 जागांवर लढणार असे येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली असून स्थानिक स्तरासह राज्यातील पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत कायमच उत्सुकता असते.
पुण्यात शनिवारी सकाळी सेनेचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांची राऊत यांनी बैठक घेतली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा दृष्टीने तयारी करावी अशी सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आली. आघाडी झाली तर एकत्र नाहीतर स्वबळावर काढायची तयारी करायची अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.सर्व ठिकाणचे इच्छुक शोधून ठेवा. निवडणूक ज्याला लढवायची आहे त्याने प्रत्येकानी तयारीला सुरुवात करा अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. सत्ता स्थापन कशी होईल त्यासाठी जे करता येईल हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- …तर आम्ही पवार साहेबांच्या मागे ठामपणे उभे राहू – चंद्रकांत पाटील
- गॅस एजन्सीच्या आमिषाने उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा घालणारा गजाआड
- अमित देशमुखांच्या सूचनेनुसार शहराच्या स्वच्छतेसाठी सहा जेसीबी सज्ज; आता स्वच्छतेची प्रतीक्षा!
- ‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा’; सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा
- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधी कोसळले ते कळणारही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
