मुंबई : साकीनाका येथे एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारातून आक्रोश नोंदवला जात आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणी राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. आरोपीला अटक झाली असून आता त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणी असा आरोप केला जात आहे की, तिचा मृत्यू हा तिला झालेल्या जखमांमुळे झाला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणे बलात्कार करणाऱ्या आरोपीने तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घातला होता. असा गुन्हेगार जिवंत आहे. ते आमच्या स्वत:च्या मुलींसाठी धोका आहे. अशा भुतांना सार्वजनिक फाशी देण्यात यावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे.
Sakinaka alleged rape victim succumbs to her injuries-rapist had inserted rod in her private parts like Nirbhaya case in Delhi.
Why are such criminals alive- they are a threat to our own daughters- I strongly feel these demons should be executed in public !#MumbaiRape #sakinaka— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2021
पीडित महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. चाकूने हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- ‘कॅंण्डल मार्चवाले आता आवाज का उठवत नाही?’; ‘साकीनाका घटनेवर वेलणकरचा संतप्त सवाल
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

