सातारा : मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा चिघळताना दिसत आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून याचे खापर आता महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे.
राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील आता मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. उदयनराजे म्हणाले, ” मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत हे सरकार कधीच गंभीर नव्हते. तसेच मराठा आरक्षण अबाधित राहण्यासाठी राज्य सरकारने तातडीनं अध्यादेश काढावा अशी देखील मागणी केली आहे. मराठा समाज आता एकटा नसून मी समाजसोबत आहे.”
उदयनराजेंच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट –
मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे.
दरम्यान, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील मराठा आरक्षण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवेंद्रराजेंनी ” आपण पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केले. यासोबतच शासनाने गांभीर्याने मराठा आरक्षणावर भूमिका घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- महाराष्ट्राबाहेरील अनुभवी डॉक्टरांना पुण्यात आणा, काँग्रेस नेत्याची मागणी
- एखादी गोष्ट अनधिकृत असेल तर प्रशासनाला कारवाई करण्याचा संपूर्ण हक्क – अनिल परब
- पुण्यात पुन्हा लॉकडाऊनच्या अफवा? महापौर म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

