Share

महाराष्ट्राबाहेरील अनुभवी डॉक्टरांना पुण्यात आणा, काँग्रेस नेत्याची मागणी

Published On: 

पुणे : पुणे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वयवर्षे ५५ पुढील डॉक्टरांना आपण निर्देश देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी व तज्ञ् डॉक्टर अश्या अवघड परिस्थितीत हतबल होऊन घरीच बसले आहेत.

सद्यस्थितीत शहरामध्ये नवखे डॉक्टर असल्यामुळे त्यांना आयसीयू , सीसीयू मधील रुग्ण हाताळण्याचा अनुभव कमी असून ते घाबरत घाबरत रुग्णांवर उपचार करतात. कोरोनामुळे डॉक्टरांचा रुग्णांशी थेट संपर्क येत नाही. कोणतीही डॉक्टरांची टीम रुग्णांना हात लावून तपासात नाही. त्यामुळे पुणे शहरात मृत्यू दर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात शहरात कोरोनाचा फैलाव झपाटयाने होताना दिसत असून देशाची तुलना केली तर पुणे हे कोरोनाचे नंबर एकचे हॉटस्पॉट झाले आहे. पुणे शहरात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर एएफएमसीची मदत घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पुणे शहराकडे स्वतः लक्ष घालून तातडीने एएफएमसीची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.

वयवर्षे ५५ पुढील अनुभवी डॉक्टर सध्या हतबल होऊन घरी असल्याने त्यांची मदत घेऊन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दररोज रुग्णांच्या परिस्थितीचा अहवाल घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करून कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवतील. कोरोनाच्या संकट काळात रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी या अनुभवी तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. सद्यस्थितीत डॉक्टर दिवस रात्र काम करत असून त्याला अनुभवी डॉक्टरांची जोड मिळाल्यास पुणे शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होईल याची खात्री वाटते.

मार्च महिन्यात कोरोना नवीन होता त्याच्या पायऱ्या आपल्याला माहित नव्हत्या परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नसून कोणत्या प्रकारचा कोरोना रुग्णाला झाला आहे. याचे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे झाले आहे. कोरोनामुळे नागरिक जास्त दगावत नसून कोरोना झाला या भीतीने जास्त मृत्यू होताना दिसत आहे. या रुग्णांचे काउंसिलिंग करण्यासाठी देखील या डॉक्टरांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल. यासाठी डॉक्टरांची काउंसिलिंग टीम करणे देखील आता गरजेचे झाले आहे.

तसेच महाराष्ट्र बाहेर जेथे कोरोना कमी आहे तेथील अनुभवी डॉक्टरांना देखील पुण्यात आणले पाहिजे. त्यासाठी देखील आपण कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. आपण याच स्थितीत राहिलो तर पुण्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एएफएमसीला शहरात त्वरित कार्यरत करावं व वयवर्षे ५५ पुढील अनुभवी डॉक्टरांची हे संकट रोखण्यास मदत घ्यावी असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!