टीम महाराष्ट्र देशा : आरक्षण द्या नाहीतर आत्महत्या करतो. असा इशारा मराठा विद्यार्थ्याने फोन करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका फेटाळली त्यानंतर त्याने हा इशारा दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. त्यांनतर राज्यसरकारने सुप्रीम कोर्टात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. इतकेच नव्हे तर एका विद्यार्थ्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन करून आरक्षण द्या नाहीतर आत्महत्या करतो. असा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे, मराठा विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विध्यार्थ्याना न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही दिले.
याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा विद्यार्थी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

