Share

“…अन्यथा कोरोनाचा विजय होईल”, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली चिंता

Published On: 

दिल्ली : कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी आणि नेते मंडळी सध्या त्रस्त आहेत. पण आता कोरोना कोणामुळे जास्त पसरतोय याच्यावरून राजकारणात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. यावर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात कि, ‘हे मतभेद करण्याचे, तसंच राजकारण करण्याची वेळ नाही’.

कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर विलगीकरणात असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. “अनेक पक्ष आपापसात लढताना दिसत आहेत. जर आपण असेच लढत राहिलो तर कोरोनाचा विजय होईल. सर्वसामान्य माणूस जो टीव्हीवर बातम्या पाहत असतो तो सर्व पक्षांना लढताना पाहून हे काय सुरु आहे म्हणत असेल ? जोपर्यंत आपण एकत्र येऊन लढणार नाही तोपर्यंत कोरोनाचा पराभव करणं अशक्य आहे. सर्व राज्य, संस्था, लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

“दिल्ली निवडणुकीत आम्ही ६२ जागा जिंकल्या आहेत. केंद्राने निर्णय घेतला आहे आणि आता त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी ही योग्य वेळ नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आणि नायब राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. यावर कोणताही वाद आणि चर्चा होणार नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

सोमवारी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राज्य सरकारचा दिल्लीमधील रुग्णालयं फक्त दिल्लीकरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द केला होता. तसंच फक्त लक्षणं असणाऱ्या रुग्णांचीच चाचणी करण्याचा निर्णयही रद्द केला होता. लक्षणं नसणारे तसंच हाय रिस्क कॉन्टॅक्ट असणाऱ्यांचीही चाचणी करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

जाणून घ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट काय आला?

अमेरिकेत परिस्थिति हाताबाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमधे लपवल

स्थलांतरीत कामगारांना केजरीवाल यांचे ‘मोलाचे’ आवाहन; अफवांवर विश्वास ठेऊ नका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!