Share

जाणून घ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजारीवालांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट काय आला?

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने कोरोना चाचणी झाली होती.

वैद्यकीय पदव्युत्तर पदविकेच्या विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं ‘राज’पुत्रा दरबारी

गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. त्यांची सकाळी COVID-19 चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आता आला असून केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून केजरीवाल यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नव्हती. त्यांनी स्वत:ला आयसोलेट करण्याचा देखील निर्णय घेतला होता.

‘निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या’ ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दरम्यान, दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसात करोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णांना सामावून घ्यायला पुरेशी रुग्णालयं आहेत का असा प्रश्न निर्माण झाल्यावर केजरीवालांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दिल्लीकरांना प्राधान्याने उपचार मिळतील. परप्रांतीयांनी दिल्लीत उपचारासाठी येऊ नये असा आदेश काढला. त्यावरून मोठा वादंग उठला होता. अखेर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरावाल यांना हा आदेश मागे घ्यायला लावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!