Share

स्थलांतरीत कामगारांना केजरीवाल यांचे ‘मोलाचे’ आवाहन; अफवांवर विश्वास ठेऊ नका

Published On: 

नवी दिल्ली : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी 14 दिवसांचा लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये अनेक अफवा पसरत आहेत. मात्र, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. तुमची सगळी जबाबदारी आमची आहे, असे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत कामगारांना विश्वास दिला.

याबाबतचे वृत्त etvbhart ने दिलं आहे. पुढे केजरीवाल म्हणाले, ‘अनेक जण तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात गावी घेऊन जाण्याचे अमिष दाखवतील, दिल्ली परिवहन विभागाच्या बसे अमुक एका ठिकाणी उभ्या आहेत, त्या गावी नेतील, अशा अफवा कामगारांमध्ये पसरत आहेत’.

तसेच पुढे ते म्हणाले, ‘कोणतीही बस सुरू नाही, कोणीही तुम्हाला गावी नेऊ शकणार नाही, घरामध्येच सुरक्षित रहा, दिल्ली सरकारने तुमच्या खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था केली आहे, असे केरजरीवाल म्हणाले.

‘कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. सगळेजण एकाचवेळी घरी जाण्यासाठी निघाले तर देशापुढे संकट उभे राहील. त्यामुळे घरातच सुरक्षित रहा,’ असे आवाहन केजरीवाल यांनी स्थलांतरीतांना केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!