मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. लखीपूर येथे मंत्र्याच्या गाडीने शेतकऱ्याला चिरडलं. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटायला निघालेल्या काँग्रेसच्या महासचिन प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरुन काँग्रेसची आक्रमकता आणखीणच वाढली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलनाला सुरवात केली आहे. केंद्र सरकारला आज त्यांनी इशारा दिला आहे.
त्यावेळच्या भाजपने इंदिरा गांधींना कार घोटाळ्यामध्ये अटक केली होती. तेव्हा त्याचा निकाल लागल्यानंतर इंदिरा गांधींनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. त्याच घटनेची पुनरावृत्ती 4 ऑक्टोबर रोजी प्रियंका गांंधींना केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर असणाऱ्या योगी सरकारने अटक केली आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं. प्रियंका गांधींना अद्यापही न्यायालयात हजर केलं नाही. त्यांचा गुन्हा काय हेही सांगितलं नाही. अशी हुकूमशाही देशात सुरु झाली आहे. काँग्रेसने भाजपची त्यावेळी जशी परिस्थिती केली तशीच आता या भाजपची होणार आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/NanaPatoleINC/videos/305032280956839/
शेतकऱ्यांना संपवणाऱ्या या भाजपला काँग्रेस जागा दाखवून देणार आहे. प्रियंका गांधींना सन्मानानेसोडलं गेलं नाहीतर उद्यापासून महाराष्ट्रात काँग्रेस ‘जेल भरो’ आंदोलन करणार, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे. ‘या आंदोलनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार राहिल’, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘भविष्यात काय होईल, हे आता पाहावं लागेल’, संजय राऊतांचा खोचक टोला
- लखीपूर प्रकरण चिघळण्याची शक्यता; परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी लखनऊकडे रवाना
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ‘ऑनलाईन’ नाहीच; राऊतांचे स्पष्टीकरण
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला


