मुंबई : कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांनी फिरायला आलेल्या दोन तरुण आणि तरुणींना बेदम मारहाण केली. तोकडे कपडे घातल्यावरुन वाद घालत सात ते आठ जणांनी चौघांना मारहाण केली. याची तक्रार करण्यासाठी नेवाळे पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या पीडित तरुणींची पोलिसांनीही दखल घेतली नाही. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘मलंगगडावर तरूण तरूणींवर झालेला हल्ला विनयभंग याचा निषेधचं. नेवाळे पोलीस ठाण्यात गेल्यावर तिथल्या पोलिसांनी दखल न घेणं हे दुदैवी आहे. याची चौकशी व्हायला हवी. समाजकंटकावर कारवाई करत वेळीच आवर घालावा. अन्यथा नागरिकांना पर्यटनस्थळी देखील स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन जावे लागेल’ असा इशारा वाघ यांनी दिला आहे.
मलंगगडावर तरूणतरूणींवर झालेला हल्ला विनयभंग याचा निषेध चं
नेवाळे पो.स्टे ला गेल्यावर तिथल्या पोलिसांनी दखल न घेणं हे दुदैव याची चौकशी व्हावी@ThaneCityPolice
समाजकंटकावर कारवाई करत वेळीच आवर घाला अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊन जावे लागेल pic.twitter.com/Y1otM9nLsB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 4, 2021
रविवारी, दि.१ ऑगस्ट रोजी संबंधित युवक-युवती कल्याण परिसरातील मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी काही टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा कारण करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. या प्रकरणावरुन संतापाची लाट उमटली असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपींसह या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पूजा चव्हाणने आत्मत्येपूर्वी मद्य प्राशन केले होते; केमिकल अँनालायसेसचा अहवाल
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी


