पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणने आत्महत्येपूर्वी दारू पिल्याची माहिती तिच्या व्हिसेरा रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळे पूजाला दारु पाजण्यात आली की ती स्वत: प्यायली असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता अनेक दिवस झालेत. या आत्महत्या प्रकरणात पूजाच्या कुटुंबीयांनी शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड यांना क्लिनचिट दिलेली आहे. मात्र, पुणे पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे. पण आता हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
पूजा चव्हाणच्या वैद्यकीय अहवालामध्ये तिच्या मानेला मार लागला होता. तर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोल असल्याची धक्कादायक बाब केमिकल अँनालायसेस अहवालात नोंद करण्यात आली आहे. या अहवालामुळे इतक्या दिवस शांत असणार प्रकरण पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलं आहे.
दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा कॅबिनेटच्या दारापर्यंत आले होते. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याची चर्चा होती. मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड यांची खुर्ची गेली, त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. पूजा चव्हाणशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
- टीम इंडियात रहाणेविरुद्ध रचला जातोय कट? गावसकरांनी केला आरोप


