Share

बळीराजा चेतना अभियानाचा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभर राबविणार – दिवाकर रावते

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला असून या अभियानांतर्गत शेतकऱ्यासाठी काय केले याचा उस्मानाबाद पॅटर्न निर्माण होणार असून हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविण्यासाठी विचार केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पालकमंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान व विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्‍यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री रावते म्हणाले की, बळीराजा चेतना अभियानासाठी उस्मानाबाद जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणून शासनाने निवड केली आहे, या अभियानामुळे शेतकऱ्यासाठी काय केले पाहिजे याचा एक पॅटर्न निर्माण करायचा आहे, त्यामुळे अभियानांतर्गत चांगले काम केले पाहिजे, यात कृषी विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. या जिल्ह्याने जे निर्माण केले ते संपूर्ण राज्यभर राबविण्याचा विचार केला जाईल. त्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला तसेच नरेगा मधून जास्तीत जास्त कामे जिल्ह्यात सुरु करावेत, यात वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, यात शेततळ्याची काम मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत, महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेततळ्याचा जिल्हा व्हावा यासाठी प्रशासनाने काम करावे, यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होईल, यावर्षी पाऊस चांगला झाला आहे मात्र पाणी वाया जाऊ नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजेत त्या दृष्टीने आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.रावते यांनी यावेळी दिल्या.

उस्मानाबादी शेळी पालन प्रशिक्षणासाठी नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करणार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी यावेळी शेतीला जोडव्यवसाय म्हणून उस्मानाबादी शेळीपालन व संवर्धनासाठी जिल्ह्यात एखादे प्रशिक्षण केंद्र किंवा विद्यापिठ सुरु करावे अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री श्री.रावते व सह पालकमंत्री श्री. महादेव जानकर यांनी नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचे मान्य केली. यावेळी पालकमंत्री श्री.रावते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सदस्यांचे अभिनंदन केले. सर्व सदस्य उच्चशिक्षित असल्यामुळे याचा प्रशासकीय कामासाठी चांगला फायदा होईल. यामुळे भविष्यात गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी मदत होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, आदी कामांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी गमे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने चांगल्या प्रकारे काम करण्याचे आश्वासन पालकमंत्री रावते व सहपालकमंत्री जानकर यांना दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!