Share

कोरोना लस वापरात उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल!

Published On: 

उस्मानाबाद: लस योग्यरित्या हाताळली तर तिच्या अनेकांचे प्रमाण वाचू शकते. कोरोना लस योग्य पध्दतीने वापर करण्याच्या संदर्भात उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचे लस वापरण्याचे प्रमाण मराठवाड्यात सर्वाधिक १०१.८४ टक्के आहे. लस वापरात हिंगोली द्वितीय तर लातूर जिल्हा तृतीय स्थानी आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लसीचे १४९८१० डोस उपलब्ध झाले होते. यातून हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्ष वयापेक्षा अधिकच्या नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या एका व्हाईल्समधून १० ते ११ डोस देता येतात. यात लसीकरण करताना १० टक्के लस वाया जाण्याची देखील शक्यता असते परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे लसीकरण केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लसीचे १४९८१० डोस उपलब्ध झाले होते. त्यातून ११७५४३ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा असे एकूण १५२५६१ डोस देण्यात आले आहेत.

यात १४५४७ आरोग्य कर्मचारी, २०४७१ फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षापेक्षा अधिकच्या ११७५४३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लस वापरात हिंगोली जिल्हा द्वितीय तर लातूर तृतीय स्थानी आहे. हिंगोली जिल्ह्याचे लस वापराचे शेकडा प्रमाण ९४.९४ टक्के तर लातूर जिल्ह्याचे ९४.४९ टक्के आहे. मराठवाड्यासाठी लसीचे १८८९६७० डोस उपलब्ध झाले होते. यातून हेल्थ वर्कर ९४६४९, फ्रंट लाईन वर्कर ११७८२९ व ४५ वर्षापुढील ७०३८४५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मराठवाड्याचे लस वापराचे शेकडा प्रमाण ९२.७९ टक्के आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. डी. के. पाटील

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!