उस्मानाबाद ः जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतून 50 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सर्वच मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. उस्मानाबाद मतदारसंघात अकरा जण रिंगणात असून, शिवसेनेचे कैलास पाटील, राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत आहे. 21 टीएमसी पाणी आणि मतदारसंघातील विकास हे प्रमुख मुद्दे प्रचारात आहेत.
निंबाळकर यांनी येरमाळा (ता. कळंब) येथील येडेश्वरी देवीचे, तर पाटील यांनी देवधानोरा (ता. कळंब) येथील खंडेरायाचे दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नंजय शिंगाडे, बहुजन समाज पक्षाकडून भिका विद्यागर, संभाजी ब्रिगेड पक्षाचे डॉ. संदीप तांबारे, आम आदमी पक्षाचे अजित खोत-पाटील, अखिल भारतीय एकता पक्षाचे रघुनाथ कसबे, टिपू सुलतान पार्टीचे सिराजोद्दीन सय्यद यांच्यासह अपक्ष म्हणून दत्ता तुपे, अजित पिंगळे, सुरेश पाटील हे रिंगणात आहेत.
तुळजापूर मतदारसंघातून सलग चारवेळा विजयी मिळविलेले कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांचे आव्हान आहे. 18 उमेदवार रिंगणात असून, अशोक जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीकडून, महेंद्र धुरगुडे हे प्रहार जनशक्ती पक्षाकडून, तर प्रशांत नवगिरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्षाकडून शैलेंद्र यावलकर, अखिल भारतीय एकता पार्टीचे अनिल जाधवर, बळीराजा पार्टीचे तात्या रोडे, टिपू सुलतान पार्टीचे तौफिक पटेल यांच्यासह अपक्ष म्हणून आतिष रसाळ, तन्वीरअली खतिब, दत्ता कांबळे, नवनाथ उपळेकर, मधुकर चव्हाण, पांडुरंग शिंदे, महानंदा दुधभाते, विशाल जानराव, शेख बाबा फैजुद्दिन हे रिंगणात आहेत.
उमरगा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले व कॉंग्रेसचे दिलीप भालेराव यांच्यात अटीतटीची लढत आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे रमाकांत गायकवाड, मनसेचे श्रावण कोकणे, बहुजन समाज पक्षाचे तानाजी गायकवाड, बळिराजा पाटीचे सचिन देडे, बहुजन विकास आघाडीचे संदीप कटबू यांच्यासह अपक्ष रावसाहेब सरवदे, अमोल कवठेकर, सूर्यकांत चौगुले, दिलीप गायकवाड हे नशीब अजमावत आहेत.
परंडा मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळविलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल मोटे यांच्यासमोर शिवसेनेचे डॉ. तानाजी सावंत यांचे कडवे आव्हान आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे सुरेश कांबळे यांनी शिवसेनेच्या भूम तालुकाप्रमुखाचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली. बहुजन समाज पक्षाचे महादेव लोखंडे, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) ऍड. रेवण भोसले, बहुजन विकास आघाडीचे गुरुदास कांबळे यांच्यासह अपक्ष म्हणून संकेत चेडे, नानासाहेब पडघण, बळीराम चेडे, आर्यनराजे शिंदे यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181557575877160960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181563809468567553?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

