Share

पोर्नोग्राफीमधून पतीची आर्थिक चंगळ, तर शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचा तोटा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे शिल्पाच्या कामावर त्याच्या परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.instagram.com/p/CRGqP89rzwa/?utm_source=ig_embed&ig_rid=201e47fc-7812-48bf-a0b7-3a0a41127664

‘सुपर डान्सर-४’ या शो मध्ये शिल्पा परीक्षक म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिल्पाने शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलं आहे. २० जुलैला या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यानंतर शनिवारी या भागात रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी स्पेशल गेस्ट म्हणून या शोमध्ये हजेरी लावली.  या शोपासून लांब असल्यामुळं शिल्पाला मोठं आर्थिक नुकसानही सहन करावं लागतं आहे. त्यामुळे आता ती या शो मध्ये पुन्हा येणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही अनूउत्तरीत आहे.

या सगळ्या दरम्यान, शिल्पा शेट्टीने अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पतीच्या अटकेनंतर ‘खोट्या, बातम्या’ चालवण्यासाठी विविध मीडिया हाऊस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीचा खटला दाखल केला. यासोबतच 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीला पोर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात अद्याप क्लीन चिट दिलेली नाही जिथे तिचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा मुख्य आरोपी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!