🕒 1 min read
Jayant Patil । मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना याबाबत विनंती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे.
“मंत्र्यांची ही भूमिका भाजपला मान्य असेल तर बडतर्फ करणार नाही आणि मान्य नसेल तर धाडसाने सरकार येत जात असतात त्यामुळे कुणाकुणाला पदरात घ्यायचे व कुणाची ओझी उचलायची हे एकदा भाजपने ठरवले पाहिजे”, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला लगावला.
“राज्यपाल हे सर्वोच्च आहेत. सरकार ऐकत नसेल तर त्यांना आम्ही कैफियत मांडू शकतो. हा विषय माफी मागून संपणार नाही. हवे ते विधान करता मग माफी मागता हे महाराष्ट्रात चालणार नाही. सरकारमधील लोकांनी विचार करावा, त्यांना आपले सहकारी कसे हवेत. अब्दुल सत्तार यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही. मंत्री आहेत म्हणून पोलीस घाबरत असतील तर पोलिसांनी आपल्या कर्तव्यापासून चुकू नये, सरकार येत आणि सरकार जात असतात”, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, या शिष्टमंडळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे इत्यादी नेत्यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | “अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत…” ; जयंत पाटील आक्रमक!
- Deepak Kesarkar | अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे – दिपक केसरकर
- Devendra Fadanvis | “सत्तार बोलले त्याचं मी समर्थन करणार…”, सुळेंबाबत केलेल्या सत्तारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Chitra Wagh | “कंगना रणावत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?” चित्र वाघ यांचा सवाल
- T20 World Cup | भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये पाऊस आला, तर कोणाला मिळणार फायनल मध्ये एन्ट्री?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
