मुंबई – दलितांवरील अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी, दलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी दि.9 जुलै 1972 रोजी दलित पँथर ची स्थापना झाली. दलित पँथर आणि त्यानंतर भारतीय दलित पँथर च्या चळवळीचा इतिहास आंबेडकरी चळवळीत सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला आहे.
दलित पँथर च्या चळवळ ही एक क्रांती होती त्यावर आधारित चित्रपट निर्माण करून नव्या पिढीसमोर दलित पँथर चा प्रेरणादायी इतिहास उलगडून दाखविण्याची गरज आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
मला नेहमी चित्रपटातील अभिनेते दिग्दर्शक कलाकार भेटत असतात. त्यामुळे मला ही वाटते आपण चित्रपटात काम करावे. चित्रपटात काम करण्यापेक्षा दलित पँथर वर चित्रपट निर्माण झाला पाहिजे अशी माझी ईच्छा आहे.त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे असे रामदास आठवले म्हणाले.
शून्य से शिखर तक फाउंडेशन च्या उदघाटन प्रसंगी ना रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी डॉ चंद्रकला सिंह, राजेश श्रीवास्तव, सिमरन आहुजा, मनोहर पतकी, नझीम शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाविरुद्धच्या ‘त्या’ वक्तव्यावर रणतुंगाला डिसील्वाकडुन घरचा आहेर
- कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा;पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार


