🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाना साधला. कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोप लागणार नाही, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षांला लगावलाय.
आरक्षण देण्यामागे आमचं कोणतंही राजकारण नव्हतं. आम्हाला फक्त मराठा समाजाला न्याय द्यायचा होता, असं गिरीश महाजन म्हणाले. मराठा समाजाच्या राजकीय फायद्याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही थाथूर- माथूर आरक्षण न देता कोर्टात टिकणारं आरक्षण दिलंय, असंही ते म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे. यावर गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला.
दरम्यान, आम्ही पावले उचलली होती. पुढाकारही आम्हीच घेतला आहे. त्यावेळी काही तांत्रिक कारणामुळे जे शक्य झालं नाही ते आता प्रत्यक्षात आणलं आहे, अशी भावना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
