Share

‘विरोधकांचं वागणं अत्यंत द्वेषपूर्ण’, पंतप्रधान मोदींचा आरोप

Published On: 

नवी-दिल्ली : येत्या विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची पूर्वतयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल(७ नोव्हें.)दिल्लीत पार पडली. बैठकीत स्वीकारलेल्या राजकीय ठरावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तसेच विरोधी पक्षावर द्वेषपूर्ण मानसिकतेने वागण्याचा आरोप केला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १८ मुद्द्यांचा समावेश असलेला हा जाहीरनामा मांडला.

बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांसह उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबच्या भाजप अध्यक्षांनी आपली मते मांडली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा उल्लेख करत येणाऱ्या निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, या ठरावात म्हटले आहे की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर नवीन उंची गाठत असताना, विरोधक केवळ अत्यंत द्वेषाच्या मानसिकतेने वागत होते आणि षड्यंत्राद्वारे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करत होते, चुकीची माहिती पसरवत होते. तसेच ठरावाच्या ब्रीफिंगमध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी साथीच्या रोगाच्या काळात विरोधी पक्ष कधीही रस्त्यावर उतरले नाहीत आणि संशय पसरवण्यासाठी स्वतःला ट्विटरपर्यंतच मर्यादित ठेवले आहे, असे वक्तव्य केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!