Share

एसटी पूर्ण क्षमतेने चालवण्यास एसटी कामगार व प्रवासी संघटनांचा विरोध

Published On: 

मुंबई : देशात आता अनलॉक-४ लागू करण्यात आला आहे. मात्र वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य परिवहन महामंडळाची सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली होती. सुरुवातीला सोशल डिस्टनसिंग तसेच आवश्यक खबरदारी घेऊन एसटी वाहतूक ही ५० टक्के प्रवाशांना घेऊनच केली जात होती.

यानंतर, राज्य परिवहन मंडळाळासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटी वाहतूक आज (दि.१८ सप्टेंबर) पासून पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. त्यामुळे एका बाजूला देशासह राज्यात उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद होत असताना ही जोखीम कशाला? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. दरम्यान, प्रवासामध्ये प्रत्येकाला मास्क घालणे व सॅनिटायझर बाळगणे आवश्यक आहे. मास्क व सॅनिटायझर असल्यासच बस मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

तर आता एसटी पूर्ण क्षमतेने धावण्यास विरोध वाढत आहे. एसटी पूर्ण क्षमतेने भरल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक संभवतो त्यामुळे चालक, वाहकांसह प्रवाशांचा जीव देखील धोक्यात येत आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करण्यास प्रवाशी देखील घाबरत असून उत्पन्नवाढीसाठी घेण्यात आलेला निर्णय धोकादायक असल्याचे एसटी कामगार संघटनांसह प्रवासी संघटनांनी सांगितले आहे. त्यामुळे ५० टक्के प्रवासी क्षमतेनेच वाहतूक करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!