मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा सर्वात चर्चेत असणारा क्रिकेटपटू म्हणजे केन विल्यमसन. केन विल्यमसन हा आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने तर ओळखला जातोच परंतु त्याच्या स्वभावात असणारी शांतता आणि स्थिरता या करता तो अधिक ओळखला जातो. २०२२ च्या आयपीएल स्पर्धेत तो हैद्राबाद संघाचे नेतृत्व करणार आहे.
न्यूझीलंडचा यशस्वी कर्णधार केन विल्यम्सनं गेले कित्येक काळ डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, तो या दुखापतीला एवढा कंटाळला होता कि कधी कधी त्याला आपला डावा हात कापावासा वाटत असे. १७ फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडचा दौरा सुरु होत आहे. १७ फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. न्यूझीलंडने नुकताच या आगामी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. परंतु, डाव्या हाताचा कोपऱ्याच्या दुखापतीमुळे केन विल्यमसनला या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळाले नाहीये. त्याला या कोपऱ्याच्या दुखापतीमधून सावरायला अजून काही आठवडे लागणार आहेत. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम हा आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाच धुरा संभाळणार आहे.
आयपीएलच्या २०२२ च्या स्पर्धेत तो हैद्राबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हैद्राबाद संघालाही त्याच्या या कोपऱ्याच्या दुखापतीची चिंता वाटू लागली आहे. डाव्या हाताच्या कोपरा दुखापतीवर विलियम्सन म्हणाला कि, ”अनेक वेळा माझ्या मनात विचार आला, की करवतीने आपला डावा हात कापावा. या प्रकारच्या दुखापतीची प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. त्यामुळे माझ्या कोपराच्या दुखापतीबाबत मी आशावादी होतो. पण तसे झाले नाही आणि खरे सांगायचे तर ते पचवणे मला कठीण जात आहे. मला डोके हलवतानाही त्रास होत आहे. पण मला न्यूझीलंड क्रिकेट आणि वैद्यकीय संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. पण एक खेळाडू म्हणून दुखापतीतून सावरणे सोपे नाही.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO: राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- ‘महाराष्ट्र अनलॅाकच्या दिशेने, पण…’; विजय वडेट्टीवार यांची माहिती
- पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार; भाजपचे शक्ति प्रदर्शन
- “अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे…” भाजपाचे ज्येष्ठ नेते के. जे. अल्फोंस
- न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

