नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ च्या आजच्या कामकाजात व्यत्यय आला आहे. कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केल्याने कामकाज काहीकाळ थांबले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात ‘जर तुम्ही (उत्तर प्रदेशच्या जनतेने) भाजपला आपले मत दिले नाही तर, प्रदेशचा काश्मीर, पश्चिम बंगाल किंवा केरळ होईल’ असे आव्हान केले होते. त्यामुळे राज्यसभेतील भाजपेत्तर खासदारांनी सभात्याग करत त्यांच्या भाषणाचा आणि भाजपचा निषेध केला.
कॉँग्रेसचे खासदार टी एन प्रतापण यांनी हे प्रकरण चर्चेत घेण्यासाठी कामकाज स्थगित करण्याच्या प्रस्तावाची सुचना दिली होती तर शुक्रवारी दुपारी सभागृहाची बैठक सुरू होताच, कॉँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चौधरी यांनी हा मुद्दा उचलून धरत, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी असे वक्तव्य करणे फार लाजिरवाणी गोष्ट असल्याचे म्हणत हा मुद्दा सभागृहात उचलून धरला. दरम्यान कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेसच्या संभासदांनी संसदेतून उठून जात निषेध नोंदवला.
राज्यसभा सभापती ओम बिरला यांनी मात्र त्यानंतर सभागृहात प्रश्नोत्तरे तास सुरू केला. कॉँग्रेस, द्रविड मूनेत्रा काझगम (DMK), क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP), TMC आदि पक्ष्यांच्या सदस्यांनी सभात्याग केला. अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी आपल्या भाषणात कॉँग्रेस आणि मनरेगा वर निशाणा साधला. त्यांनी कॉँग्रेसने मनरेगाचा दुरुपयोग केल्याचे आरोप केले.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO: राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- ‘महाराष्ट्र अनलॅाकच्या दिशेने, पण…’; विजय वडेट्टीवार यांची माहिती
- पुणे महानगरपालिकेत कि“अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे…” भाजपाचे ज्येष्ठ नेते के. जे. अल्फोंस
- रीट सोमय्यांचा सत्कार; भाजपचे शक्ति प्रदर्शन
- टीम इंडियाचा क्रिकेटपटू ठरला राजकारणाचा बळी, माजी यष्टिरक्षकाचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

